पुरंदर
सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील गुंड अतिश दळवी, यास पुणे पोलिसांनी दोन वर्षा साठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. याबाबतची माहिती सासवड पोलिसांनी दिली आहे.
गेले पाच वर्शापासुन गुंड अतिश दळवी हा गुंडगिरी करून सासवड शरात व परीसरात वेगवेगळया प्रकारे दहशत माजवत असल्याने तसेच त्याचे वर्तनात कसलाही बदल होत नसल्याने सार्वजनिक शांततेचा भंग होवुन सार्वजनीक मालमत्ता व लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होत असल्याचे दिसुन येत असल्याने त्याचे गुन्हेगारी कृत्यास आळा बसविण्यासाठी, तसेच सामान्य जनतेला होत असलेल्या त्रासातुन प्रतिबंध व्हावा म्हणुन उप.विभागिय पोलीस अधीकारी भोर विभाग सासवड. धनंजय पाटील यांचे आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक आण्णासाहेब घोलप सासवड पोलीस स्टेशन यांनी गुंड अतिश दळवी यास पुणे शहर व पुणे जिल्हयातुन तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव दौंड पुरंदरचे उपविभिय दंडाधिकारी प्रमोद गायकवाड, यांचेकडे सादर केला होता.
त्याची सुनावणी झाल्यानंतर प्रमोद गायकवाड, यांनी गुंड अतिश पांडुरंग दळवी, रा, जेजुरी नाका, सासवड, ता.पुरंदर, जि.पुणे यांस मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 56(ब) अन्वये आदेश बजावले पासुन पुणे शहर व पुणे जिल्हयातुन 2 वर्षा करीता हददपार/तडीपार करण्याचे आदेश दिले आहे.
आदेशाप्रमाणे गुंड अतिश पांडुरंग दळवी यांस सासवड पोलीस स्टेशनकडील पोलीस नाईक गणेश पोटे, निलेश जाधव, सुहास लाटणे यांनी पुणे जिल्हयाचे हददीबाहेर सोडलेले आहे तडीपार गुंड नामे अतिश पांडुरंग दळवी हा पुणे जिल्हयाचे सिमेत कोणास दिसल्यास तात्काळ सासवड पोलीस स्टेशनला संपर्क करावा. असे आवाहन सासवड पोलिसांनी केले आहे.