पुरंदर
पुरंदर तालुक्यातील घेरा पुरंदर येथे शेतात तारा लाऊन त्याला विद्युत करंट दिल्याने एका स्थानिक नागरिकांचा मृत्यू झालाय.यानंतर मृत देहावर माती टाकून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे.
या प्रकरणी सासवड पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली असून याबाबत सासवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, घेरा पुरंदर या गावामध्ये आरोपी भाउसो मारूती कोंडके व शंकर सखाराम कारकुड, दोघे राहणार रा.घेरापुरंदर, ता.पुरंदर,जि.पुणे. यांनी दिनांक १९/१०/२०२१ रोजी रोजी ९ वा. चे सुमारास शंकर कारकुड याचे शेतात रानडूकरांपासून भाताच्या शेतीचे संरक्षण करण्यासाठी व रानडूकराची शिकार करण्यासाठी उघडयावर तारा लावुन त्याला करंट दिला होता .
त्याला चिटकुन एखादयाचा मृत्यू होवू शकतो याची जाणीव असतानाही त्यांनी विदयुत करंट दिला. त्या तारांमुळे सुनिल मारूती ढगारे यांचा मध्यरात्री विजेचा करंट लागून मृत्यू झाला.
त्यानंतर त्यांनी त्याचे प्रेत खडयामध्ये टाकून पुरावा नष्ट केला. ही बाब तपासात निष्पन्न झाली त्यामूळे याबाबत पोलीस उपनिरीक्षक विनय चंद्रकांत झिंजुर्के, यांनी दिनांक २५/४/२०२२ रोजी फिर्याद दिली आहे.
याबाबतचं पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महांगडे हे करीत आहेत.