पुरंदर
पुरंदर तालुक्यातील पुर्वेस असणाऱ्या टेकवडी येथील पत्रावस्ती येथे चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम आता एकूण एक लाख 67 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी निलेश संपत इंदलकर(रा.टेकवडी) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टेकवडी पत्रावस्ती येथे दिनांक 22 मे ते दिनांक 23 मे दरम्यान चोरट्यांनी इंदलकर यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
त्यानंतर घरातून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, आठ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या व रोख पन्नास हजार रुपये असा एक लाख 67 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.