पुरंदर
काल पुरंदर तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे पुरंदर तालुक्यातील तक्रारवाडी गाव मध्ये शेतीला जोड व्यवसाय म्हणून गाई व शेळ्यांचे पालन केले होते त्यात अवकाळी पावसाचा मुळे शिवाजी तुकाराम खेंगरे या शेतकऱ्याच्या दोन मोठ्या शेळ्या एक बोकड व दोन जर्शी कालवडी हे जागीच मृत पावले आहेत.
यामुळे शेतकऱ्याने पुणे जिल्हा परिषद योजनेतून मागेल त्याला गाईचा गोठा या योजनेत त्यांनी दोन वर्षांपूर्वी अर्ज केला होता गाई गोठा मंजूर झाला होता परंतु प्रशासनाने त्यांना कळवले सुद्धा नाही की गोठा मंजूर आहे.
दोन वर्षांपूर्वी रोजगार हमी योजनेतून गोठ्यासाठी व दुधाळ जनावरांसाठी अनुदान अशी जिल्हा परिषदेच्या मार्फत योजना निघाली आणि ग्रामपंचायतींनी अर्ज भरून घेतले त्यासाठी स्थानिक व्हेटर्नरी दवाखान्याचे पंचनामे सुद्धा झाले.
जर वेळेत गाय गोठा मिळाला असता तर आजही जीवित हानी झाली नसती पैसा मी कायम कमवेल परंतु गेलेली गाई व शेळ्या मला मिळणार नाहीत सरकारने दखल घ्यावी : शिवाजी खेंगरे,तक्रारवाडी
अल्पभूधारक शेतकऱ्यांना व महिलांसाठी प्राधान्यक्रम देऊन गोठे मंजूर झाले परंतु शेतकऱ्यांनी करावयाचा खर्च व वगळता इतर खर्च जॉब कार्ड च्या माध्यमातून दाखवायचा असल्यामुळे याची लीखापडी कोण करत बसणार या वादातून ग्रामसेवकांनी या कामास प्राधान्य दिले नाही.
मोठमोठी टेंडर मंजूर करून आणून त्या योजना कशा प्रकारे राबवल्या जातात हे सर्वश्रुत आहे या उलट जॉब कार्ड धारकांना गोळा करून त्यांची लिखापढी करून शेतकऱ्यांचं भलं करावं याची प्रशासनाला गरज नाही असच म्हणाव लागेल.