पुरंदर तालुक्यातील “या” गावात अवैध दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर पोलिसांचा छापा

पुरंदर तालुक्यातील “या” गावात अवैध दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर पोलिसांचा छापा

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील गराडे सोमुर्डी या गावात  दारूची अवैध विक्री करणाऱ्या हॉटेलवर सासवड पोलिसांनी छापा टाकून दारू साठा जप्त केला असून सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस हवालदार लियाकत युनूस मुजावर यांनी यासंदर्भात सरकारी फिर्याद दाखल केली आहे . 

सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि २९ एप्रिल २०२२ रोजी सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली होती की पुरंदर तालुक्यातील सोमुर्डी गावाच्या हद्दीत ताठेलेवस्ती,गराडे सोमुर्डी रोडच्या कडेला शिवशंभो  हॉटेलमध्ये आरोपी  केतन बोराडे हा देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जवळ बाळगून ओळखीच्या लोकांना अवैध  विक्री करीत आहे.
 
सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस हवालदार लियाकत मुजावर, पोलीस नाईक गणेश पोटे, पोलीस नाईक एस. सी .नांगरे या पथकाने सदर हॉटेल वरती छापा टाकला असता या ठिकाणी आरोपी केतन बोराडे याच्याकडे 900 रुपये किमतीच्या इम्पेरियल बल्यू व्हिस्की 180 ml च्या  सहा बाटल्या, 450 रुपये किमतीच्या टॅंगो पंच कंपनीच्या 90ml  च्या 18 बाटल्या असा एकूण १  हजार ४४०  रुपयांचा दारुचा साठा जप्त करण्यात आला आहे.  सदर आरोपी वर मु. प्रो.  का.  क 65 (ई ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सासवड पोलिस पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *