पुणे
मल्हारगडावर एका जोडप्याकडून दुर्ग प्रेमीवर प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे. अश्लिल चाळे करताना हटकले म्हणून जोडप्याचा राग अनावर झाला. प्रमोद जगताप असे दुर्गप्रेमी तरुणाचे नाव आहे.त्याच्यावर सासवडमधल्या रुग्णालयात अतिक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
पुणे शहराजवळील सासवड या गावानजिक असलेल्या मल्हारगड किल्ल्यावर एका जोडप्याला अश्लिल चाळे करताना एका दुर्गप्रेमाने पकडले. त्यावर चिडलेल्या जोडप्याने दुर्गप्रेमीवर प्राणघातक हल्ला केला.अश्लिल चाळे करताना हटकले म्हणून जोडप्याचा राग अनावर झाला. चिडलेल्या जोडप्याने दुर्गप्रेमीला पकडून त्याच्या डोक्यात दगड घातले. तो रक्तबंबाळ झाल्यावर त्याचा गळा दाबण्याचाही प्रयत्न जोडप्याने केला.
दुर्गप्रेमीने जोडप्याचे मल्हारगडावर अश्लिल चाळे करतानाचे व्हिडिओ काढून हटकल्याच्या रागातून मारहाण झाल्याचे पीडित तरुणाने म्हटले. प्रमोद जगताप असे त्याचे नाव असून त्याच्यावर अतिक्षता विभागात उपचार सुरू आहेत.प्रमोद जगताप हा दररोज मल्हारगडावर जात असे. तिथे त्याला एक जोडपे अश्लिल चाळे करताना नजरेस पडले. पहिल्यांदा सांगूनही जोडप्याने ऐकले नाही. त्यानंतर प्रमोदने व्हिडीओ शूटिंग केली.
मी सांगतोय ऐका… इथून जा असे प्रमोदने जोडप्याला सांगितले. मात्र जोडपं ऐकायला तयार नव्हतं. अखेर माझ्याकडे तुमची शूटिंग आहे, गपगुमाने इथून जा, असे प्रमोदने सांगितले. त्यावर मात्र चिडलेल्या जोडप्याने प्रमोदवर हल्ला चढवला. दोघांनी मिळून प्रमोदच्या डोक्यात दगड घातले तर त्याचा गळाही दाबला, असे एफआयआरमध्ये लिहिले आहे.
पोलिसांनी याप्रकरणात तपास सुरू केला असून जोडप्याला लवकरच ताब्यात घेऊ, असे पोलिसांनी सांगितले. जोडप्याला ताब्यात घेतल्यानंतरच पुढील कार्यवाहीला गती येईल, असे सांगण्यात आले.