पुरंदर
मागील काही दिवसापासून पुरंदर तालुक्यातील महावितरण विभागाकडून कृषी पंपाच्या थकबाकी वसुलीसाठी जाहीर आवाहन, सवलत टप्पे,इतर पर्यायाद्वारे शेतकऱ्यांना विनंती करत आहे.परंतु काही थकबाकीदार कोणत्याही योजनांचा लाभ न घेता संपूर्ण विज बिल माफ होईल या आशेने विज बिल न भरण्यावर ठाम आहेत.
त्यामुळे विज बिल भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांचा वर्ग रब्बी हंगामातील कडाक्याच्या थंडीत व रात्री अपरात्री बिबट्याचा वावर असतानाही स्वतःचा जीव धोक्यात घालून एक-दोन पाण्यावर आलेली काढणी योग्य पिके असताना महावितरण विभागाकडून थकबाकी वसुलीसाठी संबंधित ग्राहकांवर कारवाई करणे ऐवजी सरसकट विद्युत रोहित्रावर वीज पुरवठा बंद करीत आहे.महावितरण विभागाची भूमिका नियमित भरणा करणारे शेतकऱ्यांवर अन्यायकारक असल्याने या शेतकऱ्यांमध्ये संतापाचे व रोशाचे वातावरण आहे.
तरी महावितरण विभागाने थकबाकी वसुली करता सरसकट बंद केलेले रोहित तात्काळ सुरू करावेत,अन्यथा शेतकऱ्यांसमवेत मला आपल्या कार्यालयासमोर सोमवार दिनांक 13.2.2023 रोजी आंदोलन करावे लागेल अशा आशयाचे पत्र आमदार संजय जगताप यांनी महावितरण ला दिले आहे.
निवेदन देताना प्रदीप आणा पोमन,गणेश जगताप,सुनीता काकी कोलते,अक्षय उरसळ,विकास इंदलकर, संतोष सोनवणे,भाऊसाहेब दळवी,साहेबराव फडतरे,सनी खेडेकर,पिनुशेठ काकडे, सचिन लिंभोरे इत्यादी उपस्थित होते.