पुरंदर
पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागात असणार्या आंबळे ग्रामपंचायतीत संविधान दिन साजरा करण्यासाठी सदस्यांना वेळच नसल्याचे आज पहावयास मिळाले.
ग्रामपंचायतीची ९ सदस्य संख्या असताना व आज ग्रामपंचायतीची मासिक सभा असताना देखील सभेसाठी व संविधान दिन असताना देखील सदस्यांना वेळ मिळाला नाही त्यामुळे संविधानाचा विसर सदस्यांना पड़लेला दिसतोय.
याबाबत ग्रामसेवकांशी विचारणा केली असता कोरम अभावी मासिक सभा तहकुब केली असल्याचे ग्रामसेवक वडवले यांनी सांगीतले.
ज्या संविधानामुळे आपल्याला ग्रामपंचायत सदस्यपदी विराजमान होण्याचा मान मिळाला त्याच संविधान दिनी ग्रामपंचायतमध्ये येण्यासाठी या सदस्यांकडे वेळच नाही ही खुपच खेदजनक बाब आहे.
याबाबत गावच्या प्रतिष्ठीत ग्रामपंचायत सदस्याला विचारले असता ते म्हणाले की संविधान दिनाच्या दिवशी मासीक सभा आली हा योगायोग असेल परंतु संविधान दिन आजच आहे हे मला माहितच नाही.