पुरंदर
पुणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पुणे कार्यालयामार्फत पुरंदर तालुक्यात आयोजित केलेल्या मिशन वात्सल्य अंतर्गत “शासन आपल्या दारी” कार्यक्रमात 63 अनाथ एकपालक बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात आला.
सदर कार्यक्रमात बाल कल्याण समिती क्र 1 च्या अध्यक्षा डॉ. महादेवी जाधवर, सदस्य बिना हिरेकर, सदस्य सविता फटाले, तसेच श्री धनराज गिराम बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामिण) ता. पुरंदर ,बी. डि काकडे विस्तार अधिकारी. Icds,श्रीमती कविता चौरे तालुका संरक्षण अधिकारी (क),श्रीमती रुपल साळुंके संरक्षण अधिकारी (सं.अ) जिल्हा बाल संरक्षण कक्ष पुणे, यांचे सहकार्यामुळे 63 अनाथ एकपालक बालकांचे बाल संगोपनचे आदेश पूर्ण केले.
पंचायत समिती सभापती नलिनी हरिभाऊ लोळे,यांनी शिबिरास भेट देऊन कमिटी चे आभार मानले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा. बाळासाहेब भिंताडे,बहुजन हक्क परिषदेचे सं.अध्यक्ष सुनीलतात्या धिवार,सचिव कैलास भाऊ धिवार,संतोष गरुड यांनी मुलांसाठी चहा,बिस्कीट,केळी,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था खूप चांगल्या प्रकारे केली होती.