पुरंदर
पुरंदर तालुका शिक्षक समितीच्या अध्यक्षपदी भिवडी (ता. पुरंदर) येथील अश्विनी चंद्रकांत शिंदे यांची नुकतीच निवड करण्यात आली सासवड येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुका कार्यकारणी विस्तार सभेत ही निवड झाली.
नवनियुक्त कार्यकारणी पुढील प्रमाणे अध्यक्ष अश्विनी शिंदे, सरचिटणीस निर्मला घाटे ,कार्याध्यक्ष नीलम दगडे, कोषाध्यक्ष निर्मला पोमण, उपाध्यक्ष हिरकणी कुंभार, सल्लागार जयश्री उबाळे यावेळी जिल्हा महिला आघाडीच्या सरचिटणीस मधुबाला कोल्हे, जिल्हा प्रतिनिधी सुजाता कुंभार, शिक्षक नेत्या संगीता हिंगणे, उज्वला कांबळे ,शितल खैरे, शुभांगी गिरी, सरिता टिळेकर, चेतना ओव्हाळ ,तेजस्विनी लांडगे, रुपाली बाठे ,अंजली तांदळे ,वैशाली म्हेत्रे,शिक्षक समितीचे अध्यक्ष सुनील कुंजीर ,सरचिटणीस भाऊसाहेब बरकडे ,कोषाध्यक्ष सुनील जगताप, शिक्षक पतसंस्थेचे संचालक गणेश कामठे ,मनोजकुमार सटाले ,सुरेश जगताप ,पुणे जिल्हा शिक्षक पतसंस्थेचे मा. चेअरमन मनोज दिक्षित, शिक्षक नेते संदीप कुंभार, संजय तांबेकर, शांगृधर कुंभार, संजय जाधव, अनिल गायकवाड ,चंदू शिंदे, संजय नारगे ,यशवंत दगडे ,निजाम मुलाणी यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित महिला कार्यकारिणीला सन्मानित करण्यात आले.
शिक्षकांच्या न्याय प्रश्नांसाठी सकारात्मक भूमिका मांडून प्रश्न सोडवणार असल्याचे नूतन अध्यक्षा अश्विनी शिंदे यांनी तर महिलांच्या हक्कांसाठी लढा देणारे हे व्यासपीठ असल्याचे कार्याध्यक्षा नीलम दगडे यांनी सांगितले.
निरीक्षक म्हणून मनोजकुमार सटाले गणेश कामठे यांनी काम पाहिले तर निवडीची घोषणा तालुका अध्यक्ष सुनील कुंजीर यांनी केली.