पुरंदर
पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या उपाध्यक्ष पदी आंबळे गावचे सुमित जगताप यांची निवड करण्यात आली आहे यानिवडीचे पत्र बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले.
पक्षाचा व संघटनेचा विस्तार करुण उपाध्यक्ष पदाची दिलेली जबाबदारी एकनिष्ठेने पार पाडुन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे सामाजिक समतेचे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहचविणार असल्याचे सुमित जगताप यांनी सांगीतले.
या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदिप गारटकर,तालुकाध्यक्ष माणिक झेंडेपाटील,वाघापुरचे उपसरपंच सौरभ कुंजीर,दिगंबर जगताप,नाजीम शेख,वैभव दरेकर तसेच आंबळेतील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.