पुरंदर
पुरंदर तालुक्यातील कुंभारवळणचे उद्योजक मनोज खळदकर यांची संभाजी ब्रिगेड पुरंदर तालुका उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.खळदकर हे आरएसएस संघटनेमध्ये आपत्ती व्यवस्थापन या पदावरती कार्यरत होते.त्यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान व समाजसेवेची असलेली आवड लक्षात घेऊन जिल्हाध्यक्ष उत्तमबापु कामठे यांनी त्यांची पुरंदर तालुका उपाध्यक्षपदी निवड केली.
आगामी काळामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये संभाजी ब्रीगेडची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन संपुर्ण तालुक्यामध्ये संभाजी ब्रिगेडचे विचार घरोघरी पोहोचवावे व गावोगावी संभाजी ब्रिगेडची शाखा व कार्यकर्ते निर्माण करावेत असे जिल्हाध्यक्ष उत्तमबापु कामठे यांनी सांगीतले.
सदर निवडीचे पत्र तालुकाध्यक्ष संदिप बनकर व जिल्हाध्यक्ष उत्तमबापु कामठे यांच्या उपस्थितीत दिले.यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय जाधव,जिल्हा संघटक योगेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.