पुणे
पुण्यात दुकानासमोर नो पार्किंगमध्ये गाडी लावू नका असं सांगणाऱ्या दुकानदार महिलेला पोलिस कॉन्स्टेबलने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस कॉन्स्टेबलने मारहाण केल्यानंतर राजकीय वर्तुळातील नेत्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सदर संतापजनक घटनेवर भाजप महिला नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात एका दुकानासमोर पोलीस कॉन्स्टेबल वाहन पार्किंग करत होते. त्याचवेळी दुकानदार महिलेने पोलीस कॉन्स्टेबलला नो पार्किंग वाहन करण्यापासून रोखलं.
वाहन नो पार्किंग करू न दिल्याने पोलीस कॉन्स्टेबल भडकला. दुकानसमोर नो पार्किंगमध्ये गाडी लावू नका असं सांगण्याऱ्या पोलीस कॉन्स्टेबलने महिलेला इजा होईपर्यंत बेदम मारहाण केली. सदर घटनेचा पुणे शहरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे शहरातील संतापजनक घटनेवर भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.चित्रा वाघ म्हणाल्या, ‘ दुकानासमोर नो पार्किंगमध्ये गाडी लावू नका असं सांगणाऱ्या दुकानदार महिलेला पोलिस कॉन्स्टेबलने इजा होईपर्यंत बेदम मारहाण केल्याची अतिशय संतापजनक आणि निषेधार्ह अशी घटना पुणे शहरात घडली आहे.
संकटकाळी ज्यांच्याकडे दाद मागतो त्यांनीच असं कृत्य करणं हे लांच्छानास्पद आहे.स्त्रीवर हात उगारणाऱ्या व्यक्तीला कॉन्सेबल म्हणून काम करण्याचा काहीही अधिकार नाही.
तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण असताना FIR ऐवजी का NC घेतलीत @CPPuneCity साहेब ??’. ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंडई पोलीस स्टेशनच्या या संबंधीत कॉन्स्टेबलवर योग्य ती कडक कारवाई तात्काळ करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. चित्रा वाघ यांच्या मागणीनंतर उपमुख्यमंत्री फडणवीस काय कारवाई करतात? हे पाहावे लागणार आहे.