पुणे
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. डुप्लिकेट सीएम विजय माने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलीन करण्याचा आरोप माने याच्यावर करण्यात आला आहे.
आरोपी शरद मोहोळ याच्यासोबत एक फोटो काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोपही माने याच्यावर करण्यात आला आहे.मुख्यमंत्री शिंदे यांचा वेश परिधान करत अनेक ठिकाणी नाचण्याचा प्रकार माने यांनी केला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांनी बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.
पोलिसांनी विजय नंदकुमार माने याच्यावर आयपीसीच्या सेक्शन419 511, 469, 500, 501, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.