पुणे
पुण्यात एका तरुणीवर लग्नाचे आमीष दाखवत मागील आठ वर्षांपासून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. अश्लील व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने पीडित तरुणीला ब्लॅकमेल केले. पीडित तरुणीने हिंमत दाखवत पोलिसात तक्रार दाखल केली, त्यावरुन चतुश्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी देबाराशी नायक विरोधात चतुर्श्रुंगी पोलिसांत बलात्कारासह पोक्सोचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फेसबुकच्या माध्यमातून पीडिता 14 वर्षाची अल्पवयीन असताना तिच्याशी ओळख केली. त्यानंतर तिचे अश्लील व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल केले.अशाप्रकारे आरोपीने अनेकदा पीडितेवर बलात्कार तसेच अनैर्सगिक अत्याचार केल्याची तक्रार तरुणीने पोलिसांकडे दिली आहे. याबाबत चतुश्रृंगी पोलिस पुढील तपास करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फेसबुकच्या माध्यमातून तरुणाने तरुणीला अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत तिच्यावर बलात्कार केला. हा सर्व प्रकार २०१४ ते २०२२ दरम्यान बेंगलोर,गुडगाव,नवी दिल्ली, जयपूर,पुणे आदी ठिकाणी घडलेला आहे. या प्रकरणी पीडित २२ वर्षीय तरुणीने आरोपी देबारशी नायक यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.