पुणे
पुणे व पिंपरी चिंचवडमधील पोलिसांना पुणे महानगर परिवहन महामंडळाने झटका दिला आहे. आजपासून (15 नोव्हेंबर) पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास करता येणार नाही. पीएमपीने पत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे.
पुण्यात वाहतूक कोंडीवरून लेटर वॉर झालं होतं त्यानंतर पोलीस आयुक्त, पुणे महापालिका आयुक्त यांच्या लेटर वॉरमध्ये पीएमपीने पत्र काढून बीआरटी काढू नये असं सांगितले होते.
मात्र आता पीएमपीएमएलकडून पोलिसांना मिळणारा मोफत प्रवास बंद करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पोलिसांना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसमधून 1991 पासून मोफत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती.