पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खेड घाट बायपास रस्त्याचे उद्घाटन व लोकार्पण आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या शुभहस्ते संपन्न

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खेड घाट बायपास रस्त्याचे उद्घाटन व लोकार्पण आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या शुभहस्ते संपन्न

पुणे

खेड घाटाच्या पायथ्याशी झालेल्या या लोकार्पण सोहळ्याला स्थानिक ग्रामस्थ व प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची लक्षणीयउपस्थिती होती. या कामाचे खरे श्रेय हे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे आहे. मी फक्त कर्तव्य म्हणून हा प्रकल्प पूर्णकरण्यासाठी व आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे खेडघाटाचे लोकार्पण या शेतकऱ्यांच्याहस्ते करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता असे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सांगीतले.

त्यानुसार दत्तात्रय कोरडे, देवराम थिगळे, दशरथ थिगळे, तुकाईवाडीच्या सरपंच कुसुम भांबुरे यांच्या हस्ते हा लोकार्पणसोहळा पार पडला.

या कार्यक्रमाला आमदार श्री. दिलीपअण्णा मोहिते पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. निर्मलाताई पानसरे, तालुकाध्यक्षश्री. कैलास सांडभोर, सभापती श्री. विनायक घुमटकर, महिला तालुकाध्यक्ष सौ. संध्याताई जाधव, युवती अध्यक्ष आशातांबे कांचन ढमाले, युवक अध्यक्ष कैलास लिंभोरे, युवक जिल्हाध्यक्ष सोमनाथ दौंडकर, विजय डोळस, दिलीप मेदगे, अरुण चांभारे, बाबा राक्षे, विलास कातोरे, बाळशेठ ठाकूर, रामदास ठाकूर, दादा इंगवले, सुभाष होले, नवनाथ होले, अरुण थिगळे, धैर्यशील पानसरे, मनीषा सांडभोर व अन्य पदाधिकारी, तुकाईवाडी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदीउपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *