पुणे जिल्ह्यातील संतापजनक घटना !!! “या” गावात आईनेच स्वत:च्या सहा महिन्यांच्या मुलीला टाकले रस्त्यावर

पुणे जिल्ह्यातील संतापजनक घटना !!! “या” गावात आईनेच स्वत:च्या सहा महिन्यांच्या मुलीला टाकले रस्त्यावर

पुणे

शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे जन्मदात्या आईनेच सहा महिन्यांच्या मुलीला पुणे नगर महामार्गाच्या बाजूला शंभर मीटर आतमध्ये रस्त्याच्या बाजूलाच लाकडाच्या बॉक्समध्ये टाकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने कोरेगाव भीमा परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेमुळे अनेकांचे डोळे पाणावले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव भीमा परिसरातील फरची ओढा येथील गव्हाणे पाटील नगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या जय मल्हार फॅब्रिकेशनसमोर मुलगी असल्याचे स्थानिक नागरिक अजय गव्हाणे आणि किरण गव्हाणे यांनी सांगितले.

याबाबत शिक्रापूर पोलिसांना स्थानिक नागरिकांनी कळवले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी माहेर संस्थेच्या संस्थापिका ल्युसी कुरियन यांना कळवले.

त्यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, महिला पोलीस नाईक अपेक्षा तावरे, पोलीस अंमलदार प्रताप कांबळे, यांच्यासह १०८ अँब्युलन्स कर्मचारी आणि डॉक्टर पोळ तातडीने येत सहा महिन्यांच्या मुलीला ताब्यात घेतले.पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र शिक्रापूर येथे मुलीला पोलिसांच्या निगरानित पाठवण्यात आले.

दुपारच्या सुमारास रस्त्यावर स्वतच्या आईने या लहान मुलीला टाकून ती पळून गेली. ते बाळ मात्र थंडीत कुडकुडत आणि रडत होते. त्या चिमुकल्याला माश्यांचा देखील त्रास होत होता. त्यावेळी तिथून जाणारे किरण गव्हाणे यांना ते दिसले. त्यांनी पोलीस येईपर्यंत तब्बल पाऊण तास मुलीशेजारी बसून माश्या दूर केल्या.

यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांनी दाखवलेली माणुसकी ही नक्कीच कौतुकास पात्र आहे. पोलिसांकडून या प्रकरणात गुन्हा दखल करण्याचे काम सुरू असून स्वतच्या आईने पोटच्या गोळ्याला असं रस्त्यावर टाकून सोडून जाणं, हे सर्वांच्या मनाला चटका लावणारं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *