पुणे
खेड प्रांताधिकारी, तहसीलदार आणि महसूल कर्मचाऱ्यांनी भामा आसखेड धरणाच्या किनाऱ्यावर असलेल्या अनधिकृत रिसॉर्टमध्ये केलेली रंगीत संगीत पार्टी, धमाल आणि डान्स करताना मारलेले ठुमके आणि पार्टीतील कारनामे यांचा व्हिडिओ वायरल झाला आहे.
अनेकांनी या पार्टीवर आक्षेप घेत तक्रारी केल्या असून या प्रकरणी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी खेड प्रांत अधिकारी यांच्याकडून अहवाल मागवला आहे.विधानसभा निवडणुकीची मतमोजणी संपल्यानंतर काही दिवसांनी भामा-आसखेड धरणाच्या तीरावर असलेल्या एका वादग्रस्त रिसॉर्टवर अधिकारी – कर्मचाऱ्यांची पार्टी आयोजित करण्यात आली होती.
पार्टीतील एका सर्वोच्च क्षणी प्रांताधिकारी अनिल धोंडे तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह महसूल खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जोरदार डान्स केला, साऊंड सिस्टीम त्याचबरोबर या वादग्रस्त रिसॉर्टचे मालक हेदेखील या डान्समध्ये सहभागी झाल्याची नागरिकांची तक्रार आहे. माजी मंत्री आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनीदेखील या पार्टी प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.