पुणे
पुणे जिल्ह्यातील दौंड तहसील कार्यालयासाठी शासनाने सुमारे साडे आठ कोटी खर्च केला असून सर्व सामान्य जनतेच्या आय मधून तो खर्च झालेला आहे परंतु दौंड कार्यालयाची परिस्थिती पुराणी हवेली प्रमाणे झाली आहे,कृषी विभाग , पुरवठा विभाग ,महसूल विभाग असे अनेक विभाग पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरती आहेत.
या इमारतीमधील अनेक महिन्यापासून लिफ्ट बंद असल्यामुळे वयोवृद्ध दिव्यांग महिला भगिनी कामे घेऊन येतात त्यांना लिफ्ट चालू नसल्यामुळे खूप नाहक त्रास होत आहे .
प्रशासकीय इमारतीमध्ये जागोजागी अस्वच्छता प्रत्येक, इमारतीच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तंबाखू, गुटखा खाऊन केलेली घाण दिसत आहे,तहसीलदार ,नायब तहसीलदार आपल्या केबिनमध्ये दिसत नाही,काही प्रशासकीय विभागात शासकीय मंजुरी नसताना खाजगी कामगार काम करताना दिसत आहे . त्यांच्याकडे ओळख पत्र आढळून आले नाही.
या सर्व बाबींकडे तहसीलदार साहेबांनी लक्ष द्यावे आणि या प्रशासकीय इमारतीमध्ये जो अनागोंदी कारभार चालू आहे .त्यामध्ये सुधारणा करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने प्रहार स्टाईल आंदोलन करण्यात येईल : रमेश शितोळे – देशमुख अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष दौंड तालुका
प्रत्येक प्रशासकीय विभागांमध्ये खुर्च्या आहेत पण अधिकारी खुर्चीवर दिसत नाही ,काही प्रशासकीय विभागाला टाळे लावलेले दिसून आले आहेत,सर्व स्वच्छता गृह पूर्णपणे अस्वच्छ आहेत सर्व भांडी तुटलेल्या अवस्थेत असून अतिशय दुर्गंधी सुटलेली होती,कामकाजासाठी आलेल्या नागरिकांना बसायला बाकडे मांडले आहेत ते पूर्णपणे तुटलेले आहेत ,मोडले आहेत .
खाजगी एजंट यांचा सुळसुळाट दिसून येत आहे .प्रशासकीय इमारतीच्या दर्शनी भागात कडू गवत मोठ्या प्रमाणात दिसत आहे .