पुणे जिल्ह्यातील “या” गावात उसाच्या शेतीजवळुन जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने घेतला एकोणीस वर्षीय तरुणीच्या नरडीचा घोट

पुणे जिल्ह्यातील “या” गावात उसाच्या शेतीजवळुन जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने घेतला एकोणीस वर्षीय तरुणीच्या नरडीचा घोट

पुणे

पुण्यातील शिरुर तातुक्यातून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील जांबुत येथील जोरी मळ्यात १९ वर्षीय तरुणीवर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला आहे.

या घटनेत बिबट्याने तरुणीला ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, घराजवळील ऊसाच्या शेती जवळून तरुणी जात होती. त्याचवेळी बिबट्या शिकारीच्या शोधात दबा धरून बसला होता.

त्याचवेळी त्या बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. बिबट्याच्या या हल्ल्यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

पूजा नरवडे असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या १९ वर्षीय तरुणीचे नाव आहे. पूजा नरवडेच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबाकडून आक्रोश करण्यात येत आहे. पूजाच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *