पुणे
स्टिंग बिक्रीवर प्रतिबंध आणि दंड
• नागरिकांमध्ये आकर्षण असलेले एनर्जी ड्रिंक आणि शरीराला अपायकारक असलेल्या स्टिंगच्या विक्रीवर बंदी घालत स्टिंग विक्री केल्यास पाच हजार दंड केला जाणार असल्याची माहिती जातेगाव बुद्रुकचे सरपंच निलेश उमाप यांनी दिली आहे
ग्राम पंचायत चा निर्णय
• जातेगाव बुद्रुक (ता.शिरूर) ग्रामपंचायतच्या बैठकीत स्टिंग या एनर्जी ड्रिंकमुळे युवकांच्या शरीरावर होणाऱ्या गंभीर बाबींचा तसेच युवकांना या स्टिंगच्या सेवनाची लागलेली सवय याबाबत चर्चा करून गावामध्ये स्टिंग तसेच नशेच्या पानांच्या विक्रीवर बंदी घालण्याबाबत ठराव संमत करण्यात आला आहे.
• ३० ऑगस्ट पासून गावामध्ये स्टिंग व नशेबाज पानांच्या विक्रीवर बंदी घालत त्याबाबतचे पत्र सर्व हॉटेल्ससह अन्य व्यावसायिकांना देण्यात आले आहे.
• गावामध्ये अशाप्रकारची विक्री अथवा साठा आढळून आल्यास प्रथम पाच हजार रुपये व दुसऱ्यांदा दहा हजार रुपये दंड आकरण्यात येणार असल्याचे सरपंच निलेश उमाप यांनी सांगितले आहे.