पुणे जिल्ह्यातील खळबळजनक प्रकार! “या” गावात घरगुती वादातून पुतण्याकडुन चुलत्याचा लोखंडी रॉड छातीत खुपसून निर्घृण खून

पुणे जिल्ह्यातील खळबळजनक प्रकार! “या” गावात घरगुती वादातून पुतण्याकडुन चुलत्याचा लोखंडी रॉड छातीत खुपसून निर्घृण खून

पुणे

घरगुती वादातून पुतण्याकडुन चुलत्याचा लोखंडी रॉड छातीत खुपसून निर्घृण खून झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.चाकण-शिक्रापूर रस्त्यावर बहुळ (ता.खेड) गावच्या हद्दीत पानसरेवस्ती येथे शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.चाकण पोलिसांनी या प्रकरणी एकास अटक केली आहे.

दत्तात्रय बाबुराव पानसरे (वय ६२, रा.पानसरेवस्ती, बहुळ) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. दशरथ गुलाब पानसरे (रा.बहुळ) याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे, तर तुकाराम दत्तात्रय पानसरे हे गंभीर जखमी असल्याने रुग्णालयात उपचार घेत आहेत. तुकाराम दत्तात्रय पानसरे यांनी या प्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुळ (ता.खेड) येथे घरगुती वादातून दशरथ गुलाब पानसरे याने त्याचा सख्खा चुलत भाऊ तुकाराम दत्तात्रय पानसरे यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड छातीत खुपसण्याचा प्रयत्न केला. तो तुकारामने अडवला. त्यामध्ये त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर, तुकारामचे वडील दत्तात्रेय पानसरे हेही तुकारामला का मारतोस, अशी विचारणा केली असता, आरोपी दशरथ यानी त्यांच्या छातीत लोखंडी रॉड खुपसून त्यांना जीवे ठार मारले. चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *