पुणे
राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हडपसर हांडेवाडी रोड येथील जेएसपीएम कॉलेजमधून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका नराधमाने कॉलेजमधील लेडीज हॉस्टेलच्या टॉयलेटमध्ये घुसून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे.
या घटनेमुळे कॉलेजसह शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, JSPM कॉलेजमधील मुलींच्या होस्टलमध्ये गेल्या काही दिवसांपासून स्वछातागृहाचं काम सुरु होतं. काम करायला आलेल्या कामगारानेच एक तरुणी टॉयलेटमध्ये गेली असता, तिच्यावरती अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
खुद्द आरोग्यमंत्र्यांच्या शिक्षण संस्थेत असा प्रकार घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून नराधम आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुलींसह त्यांच्या पालकांकडून करण्यात येत आहे.दरम्यान, या घटनेप्रकरणी वानवडी पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी ही घडली असून अजूनही आरोपीला अटक झालेली नसून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.