पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना !     “या” गावातून दहा वर्षीय चिमुकलीचे अपहरण; सगळीकडे शोधलं,अखेर आईची पोलिसांकडे धाव

पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना ! “या” गावातून दहा वर्षीय चिमुकलीचे अपहरण; सगळीकडे शोधलं,अखेर आईची पोलिसांकडे धाव

पुणे

पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत ग्रामपंचायत हद्दीतून एका १० वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना शनिवारी समोर आली आहे. कु. सलोनी तीलकसिंग टाक (वय-१०, रा. यवत, ता. दौंड) असं अपहरण करण्यात आलेल्या मुलीचं नाव असून याप्रकरणी मुलीची आई सुनिता कौर तीलकसिंग टाक (वय-३०, रा. पॉवरहाऊस, यवत ता. दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण झालेली सलोनी ही १० वर्षांची आहे. शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घराबाहेर खेळायला जाते असे सांगून सलोनी घराच्या बाहेर पडली होती. परंतु ती परत न आल्याने कुटुंबीयांनी आजुबाजूला व चौफुला, केडगाव, भांडगाव, खोर येथील नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र सलोनी कोठेही सापडली नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने फुस लावून तिला पळून नेल्याची तक्रार तिच्या आईने दिली आहे.

दरम्यान, सदर मुलीचा रंग- गोरा, चेहरा- गोल, केस- काळे , उंची -अंदाजे ४ फुट, अंगात निळ्या रंगाचा कुर्ता व निळ्या रंगाची पॅन्ट असून ती मराठी व हिंदी भाषा बोलते. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी भेट दिली असून याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मदने हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *