पुणे जिल्ह्यात मातृत्वाच्या नात्याला काळीमा!!!!!दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून पोटच्या मुलाने जन्मदात्या आईवर केला चाकूने प्राणघातक हल्ला

पुणे जिल्ह्यात मातृत्वाच्या नात्याला काळीमा!!!!!दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून पोटच्या मुलाने जन्मदात्या आईवर केला चाकूने प्राणघातक हल्ला

पुणे

मातृत्वाच्या नात्याला काळिमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी घटना पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. दारूचे पैसे न दिल्याच्या रागातून एका मुलाने झोपेत असलेल्या आईवर चाकूने वार केले.या हल्ल्या तिला गंभीर जखमी केले. सुदैवाने, प्रसंगावधान राखत भावाने आईला तात्काळ रुग्णालयात दाखल केल्याने तिचा जीव वाचला. मात्र, तिची प्रकृती अद्याप अतिशय गंभीर आहे.

आरोपीचे नाव कृष्णा पप्पू कांबळे (वय ३०), सावित्रीबाई फुले वसाहत, सिंहगड रोड, पुणे असे असून पीडित महिलेचे नाव कौशल्य पप्पू कांबळे आहे. या प्रकरणी पीडितेचा मुलगा आणि आरोपीचा भाऊ बाबासाहेब पप्पू कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा कांबळे, आई कौशल्य कांबळे, भाऊ बाबासाहेब आणि वहिनी सोबत राहतो. आरोपीला दारूचे आणि इतर व्यसनाचे प्रचंड व्यसन असून, तो कोणतेही काम करत नाही. त्यामुळे तो नेहमी आईकडेच पैसे मागत असे आणि पैसे न दिल्यास वाद घालत असे.

घटनेच्या दिवशी रात्री उशिरा कृष्णाने आईकडे दारूसाठी पैसे मागितले. आईने नकार दिल्याने त्याने मनात राग धरला. रात्री सर्व जण झोपेत असताना, तो स्वयंपाकघरातून चाकू घेऊन आला आणि आईच्या छातीवर चाकूने वार केला. अचानक झालेल्या हल्ल्याने घरात आरडाओरडा झाला. भाऊ बाबासाहेब जागे झाले, पण तोपर्यंत आरोपी घरातून पळून गेला होता. भावाने तात्काळ आईला रुग्णालयात दाखल केले. सध्या ती अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला असून लवकरच त्याला अटक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी, हत्या, मारामारी, दराडे यासारख्या अनेक घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांचा धाक राहिलाय की नाही असाच प्रश्न निर्माण होतो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *