दौंड
दौंड तालुक्यातील मौजे उंडवडी तालुका दौंड जिल्हा पुणे, येथील ग्रामपंचायत विकास कामांच्या भूमिपूजन लोकार्पण सोहळ्यात ग्रामपंचायत कार्यालयात स्वतंत्र गाव पोलीस पाटील कक्षाचे उद्घाटन दौंड तालुक्याचे आमदार राहुल दादा कुल यांच्या हस्ते करण्यात आले, महाराष्ट्रात प्रथम दौंड तालुक्यातील मौजे उंडवडी ग्रामपंचायतीने गाव पोलीस पाटील कक्ष उभारण्याची कामगिरी केली असल्याचे बोलले जात आहे, आमदार राहुल कुल यांनी या कामगिरी बद्दल ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि सदस्य यांचे कौतुक केले आहे.
तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, पोलीस पाटील निळू भाऊ थोरात, पोलीस पाटील अविनाश शेंडगे, पोलीस पाटील दिवेकर आप्पा, पोलीस पाटील सोनवणे तात्या, उंडवडी गावचे पोलीस पाटील राजेंद्र ज्ञानदेव जगताप यांनी उंडवडी ग्रामपंचायत पदाधिकारी व मान्यवरांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या वतीने, अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांनी शासन दरबारी गाव पोलीस पाटील कक्षाची मागणी केली होती,
राज्यातील ग्रामीण भागात, गाव पोलीस पाटील यांना स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात स्वतंत्र गाव पोलीस पाटील कक्ष असावे या अनुषंगाने दौंड पंचायत समिती गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांनी तत्काळ दखल घेऊन दौंड तालुक्यातील महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन देण्यात आले होते, उंडवडी ग्रामपंचायत सरपंच सौ दीपमाला जाधव, उपसरपंच विकास कांबळे, ग्रामसेवक श्रीमती एस एम जाधव, ग्रामपंचायत विद्यमान सदस्य मैनाताई गुंड, विमल जाधव, सुनील नवले, रूपाली होले, वंदना दोरगे, चिंतामण लोहकरे, सुनील जगताप,रोहिदास जाधव, उंडवडी गावातील ग्रामस्थ मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते,उंडवडी गावचे पोलीस पाटील राजेंद्र जगताप आदींनी या विषया संदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यात आला होता मौजे उंडवडी ग्रामपंचायत कार्यालयात गाव पोलीस पाटील स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले असल्याचे गाव पोलीस पाटील राजेंद्र ज्ञानदेव जगताप सांगितले आहे