पुणे
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत २१ पैकी १४ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर उर्वरित ७ पैकी ६ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, तर एका जागेवर भाजपने बाजी मारली. त्यामुळे एकहाती सत्ता मिळवण्याची स्वप्न पाहणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.
विशेष म्हणजे भाजप उमेदवार प्रदीप कंद यांना बारामतीमधून ५२ मतं मिळाली आहेत, त्यामुळे “साथ कोणी दिली? बारामती” अशा घोषणा कार्यकर्ते देत आहेत.
राष्ट्रवादीने प्रतिष्ठेच्या केलेल्या एका जागेवर पक्षाला दणका बसला आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश घुलेंचा पराभव केला आहे. सुरेश घुले यांचा १४ मतांनी पराभव झाला.
अजित पवारांनी प्रचार सभेत कंद यांना जागा दाखवून देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, नेमकी तीच जागा जिंकण्यात राष्ट्रवादी अपयशी ठरली आहे.