चालक संभाजी काळे व वाहक ढोणे यांचे सर्व स्तरातुन कौतुक
पुणे
हडपसर ते वरवंड या मार्गावर नव्याने सुरु झालेली पीएमपीएलची नविन बससेवा ही प्रवाशांसाठी कायमच वरदान ठरलेली आहे.या मार्गावरील बस क्रमांक ६५अ या बसमधील चालक संभाजी काळे व वाहक ढोणे यांनी आज त्यांच्यामधील माणुसकीचे दर्शन प्रवाशांना दिसले.
बस क्रमांक ६५ अ ही बस सकाळी ११:३० वाजता हडपसर ते वरवंड यामार्गे धावते या बसमध्ये वाघापुर चौफुला याठिकाणी जाणारा प्रवाशी बसलेला होता.
परंतु प्रवाशी नवीन असल्याकरणाणे उरुळी कांचनपर्यंतचा रस्ता माहिती असल्याने बस उरुळी कांचनच्या पुढे वरवंड मार्गावर जात असताना प्रवाशाने चालक ढोणे यांकडे विचारणा केली असताना ही बस वाघापुर चौफुला याठिकाणी न जाता केडगाव चौफुला याठिकाणी जाते असे वाहकाकडुन सांगण्यात आलेपरंतु परिस्थितीचे गांभीर्य पाहता चालक संभाजी काळे यांनी त्या प्रवाशाची विचारपुस केली व त्या प्रवाशास उरुळी यवत रस्त्यावर असणार्या भुलेश्वर फाट्यावर सोडले. प्रवाशास भुलेश्वर फाट्यावर सोडताना वाहकाने त्या प्रवाशास स्वत: रस्ता ओलांडुन दिला.
वयोवृद्ध प्रवाशास स्वत:चालक व वाहक यांनी सोलापुर महामार्ग ओलांडुन दिला.चालक संभाजी काळे व वाहक ढोणे यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.