पुरंदर
पुरंदर तालुक्यातील पुर्वेस असणार्या आंबळे याठिकाणी असणार्या मरीआई मातेच्या मंदिरावर कलशारोहनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
माता मरिआईच्या कलशारोहनाचा कार्यक्रम संपन्न होत असताना बंडुकाका तावरे व त्यांचे सहकारी यांनी विधीवत होमहवन केले.
या विधीवत पुजेसाठी आंबळेतील तीन जोडप्यांना मान मिळाला त्यामध्ये सपत्नीक पुजा व होमहवन करण्यासाठी अमोल दरेकर,अनिल शेंडगे व नामदेव थोरात यांनी सहभाग घेतला.
मरीआईमाता मंदिरावर कलशारोहन श्री कार्तिकस्वामी आश्रम देवदरी अंभेरीचे परमपुज्य परशुरामजी महाराज वाघ यांनी केले.
या कार्यक्रमासाठी आंबळे गावचे उपसरपंच सचीन दरेकर, मा.सरपंच मंगेश गायकवाड,शशिकांत दरेकर,मा.सदस्या संजीवनी गायकवाड, सदस्या सरस्वती शेंडगे,दिलीप जगताप,विकास शेंडगे, यशवंत शेंडगे,दिपक गायकवाड,अक्षय शेंडगे,अश्विन शेंडगे,रामचंद्र बधे, अशोक थोरात,गंगाराम शेंडगे,बाळु चव्हाण,विठ्ठल कुंजीर, शुभम शेंडगे आदी उपस्थित होते.