जत
जत तालुक्यातील बाज येथील पत्रकार एन बी गडदे यांना मारहाणप्रकरणी मुख्य संशयित आरोपी माजी सरपंच संजय आनंदा गडदे यांच्यासह तिघा संशयित आरोपींना जत पोलीसांनी अटक केली. त्यांना जतचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
पत्रकार गडदे मारहाण प्रकरणी जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले यांनी तपास केला होता. संशयितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रकारांनी केली होती.
जतचे सहाय्यक सरकारी वकील जे.जे पाटील यांनी फिर्यादी पक्षाची बाजू सक्षम पणे न्यायालयात मांडली प्रसार माध्यम व्यक्ती व प्रसार माध्यम संस्था हिंसा व मालमत्ता नुकसान अधिनियम २०१७ च्या कलमानुसार संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार जतचे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी मा. अ. भा.जाधव यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली.
उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले यांनी मारहाण प्रकरणातील संशयित आरोपी संजय गडदे, अशोक बिरू गडदे व विकास बंडगर या तिघांना अटक केली आहे अन्य चार संशयित अनोळखी फरार आहेत.