पुरंदर
पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुक नुकतीच जाहिर झाली आहे. पुरंदर पंचायत समितीच्या पिसर्वे गणातुन कॉंग्रेस पक्षाने संधी दिली तर निवडणुक लढविणार असल्याचे सिंगापुर ग्रामवंचायतचे सदस्य अक्षय उरसळ यांनी संजीवनी न्युजशी बोलताना सांगीतले.
अक्षय उरसळ हे सिंगापुर गावचे रहिवाशी असुन ते गेल्या चार वर्षापासुन सिंगापुर ग्रामपंचायतीचे सदस्यपद भुषवित आहेत.
एक तरुण चेहरा म्हणुन त्यांची पुरंदरच्या पुर्व भागात चांगलीच ख्याती आहे. पुरंदर तालुका युवक कॉंग्रेस चे उपाध्यक्ष म्हणुनही ते कॉंग्रेस पक्षाची भुमिका तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहेत.
पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांचे विश्वासु सहकारी म्हणुन अक्षय उरसळ यांच्याकडे पाहिले जाते.
येणार्या काळात पंचायत समितीच्या माध्यमातुन पिसर्वे गणाचा सर्वांगीण विकास करण्याचा माणस असल्याचे अक्षय उरसळ यांनी सांगीतले.