पंधराशे रुपये दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर तीन हजार रुपये वसूल करणार; “या” महिला नेत्याची जाहीर सभेत दमबाजी

पंधराशे रुपये दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर तीन हजार रुपये वसूल करणार; “या” महिला नेत्याची जाहीर सभेत दमबाजी

पुणे

१५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० रुपये वसूल करणार, अशी दमबाजी कोल्हापूर भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघाराणी जाधव यांनी केली. यावरून मेघाराणी जाधव यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेवरून भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आता मेघाराणी जाधव यांनी भाजपाला मत दिले नाही तर, तीन हजार रुपयांची वसुली करणार अशी धमकीच दिली आहे. याचा व्हिडीयो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

करवीर पन्हाळा गगनबावडा येथील प्रचार सभेत त्या बोलत होत्या.लाडकी बहिणी योजनेचे पंधराशे रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅली दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, नावं लिहून घ्या. कारण घ्यायचं आपल्या शासनाचे आणि गायचं त्यांचं असं चालणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य काही दिवसांपूवा धनंजय महाडिक यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *