पुणे
राज्यात सध्या बहुतांशी जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. गारठा कमी झाला असून उकाडा वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पाऊस देखील कोसळला आहे. काल देखील काही ठिकाणी पावसाची हजेरी होती.
यामुळे रब्बी हंगामातील पीक व्यवस्थापनाच्या कामासाठी लगबग करत असलेला बळीराजा धास्तावला आहे. दरम्यान आता आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चिरपरिचित व्यक्तिमत्व अर्थातच पंजाबराव डख यांचा देखील काळजाचा ठोका चुकवणारा अंदाज समोर आला आहे. डख यांनी डिसेंबर महिन्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस बरसणार असल्याचे सांगितले आहे.
एका शेतकरी मेळाव्या दरम्यान पंजाब रावांनी आपला नवीनतम हवामान अंदाज सांगितला आहे. यांच्या मते येत्या 21, 22, 23 डिसेंबर रोजी राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. हे तीन दिवस राज्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. याशिवाय पंजाबरावं डख यांनी पुढील महिन्यात अर्थातच जानेवारीमध्ये देखील पावसाची शक्यता असल्याचे नमूद केले आहे.
दोन, तीन आणि चार जानेवारी रोजी राज्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी राहणार आहे. असा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. निश्चितच खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
या नुकसानीची भरपाई काढण्यासाठी शेतकरी बांधव रब्बी हंगामातील पीक व्यवस्थापनासाठी सध्या लगबग करत आहे. रबी हंगामातून तरी आपल्याला खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई काढता येईल चांगले उत्पादन मिळेल अशी आशा बळीराजा बाळगून आहे. मात्र तूर्तास तरी शेतकऱ्यांमागील संकट कमी झालेली दिसत नसून पुन्हा एकदा पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.