पुरंदर
ग्राम गौरव प्रतिष्ठान (पाणी पंचायत) खळद, ता. पुरंदर, जिल्हा पुणे, येथे आज पंचक्रोशी सुविधा केंद्राचे उदघाटन मा.ना.बाळासाहेब थोरात,कृषि राज्यमंत्री मा विश्वजीत कदम, आमदार संजय जगताप व शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. या सुविधा केंद्रात शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या शेती पूरक प्रक्रिया करून दिल्या जातील.
यात तेल घाणा, डाळ मिल, धान्य प्रतवारी, शेंगा फोडणी मशीन, पर्जन्य मापक, शेती ग्रंथालय, आवळा प्रक्रिया, आणि इतर आवश्यक सुविधा दिल्या जातील.
या कार्यक्रमाप्रसंगी ग्राम गौरव प्रतिष्ठान संस्थेला जलसंधारण कामात मदत करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्याचे संचालक उपस्थित होते. यात सुत्तट्टी, साज इंडस्ट्री, रोटरी क्लब, व्ही. जी. जोशी ट्रस्ट, अवनीश गुप्ता आदींचा समावेश आहे.