धक्कादायक !!!!! पुण्यातील “या” भागात “तसल्या” वस्तुंची आॉनलाईन विक्री ; पोलिसांनी टाकला छापा,तब्बल दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

धक्कादायक !!!!! पुण्यातील “या” भागात “तसल्या” वस्तुंची आॉनलाईन विक्री ; पोलिसांनी टाकला छापा,तब्बल दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे

पुण्यात ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून सेक्सटॉईजची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लष्कर पोलिसांनी एका गोडाऊनवर छापा टाकून १० लाखांच्या सेक्स टॉईजचा साठा जप्त केला आहे.

शहरातून इतक्या मोठ्या किमतीचे सेक्स टॉईज जप्त केल्यानंतर पुण्यातील तरुणाईला ‘सेक्स टॉईज’चं वेड लागलंय की काय अशी सध्या चर्चा सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सगळ्या वस्तूंची ऑनलाईन विक्री सुरू होती. याप्रकरणी तपास सुरू असून सेक्स टॉईज सापडलेल्या गोडाऊनमध्ये असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच काही अल्पवयीन मुलांना हे सेक्स टॉय विकल्या जात होत्या का? याचा तपास पोलिस करत आहेत.मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पुण्यातील पुलगेट चौकीच्या बाजुला असलेल्या भाजी बाजारच्या गोदामावर पोलिसांनी छापा टाकला.

यावेळी गोडाऊनमध्ये अनेक सेक्स टॉय होते. याची किंमत जवळपास दहा लाख रूपयांच्या आसपास होती. पोलिसांनी गोदामातील एका व्यक्तीला ताब्यात घेत हा सर्व मुद्धेमाल जप्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *