धक्कादायक !!!!!   चक्क “या” ग्रामपंचायतीसमोरच चालायचा वेश्या व्यवसाय; दोन महिला आणि पुरुषांना अटक

धक्कादायक !!!!! चक्क “या” ग्रामपंचायतीसमोरच चालायचा वेश्या व्यवसाय; दोन महिला आणि पुरुषांना अटक

अकोला

अकोला जिल्ह्यातील निमकर्दा गावात सुरू असलेल्या कुंटनखान्यावर पोलिसांनी छापा टाकत, दोन महिला व दोन पुरुषांना अटक केली आहे. गावातील ग्रामपंचायतीसमोरच एका घरात हां कुंटणखाना सुरु होता. माहितीच्या आधारे पोलिसांनी येथे कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

पैशाचे अमिष दाखवून महिला आणि तरुणींकडून हा वेश्‍या व्यवसाय करुन घेत असल्याचे पोलीस तपासांत समोर आले असुन, ग्राहकांना आवश्यकतेनुसार पैशाच्या मोबदल्यात महीला व तरुणींचा पुरवठा करत असल्याचंही समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना माहिती मिळाली की, निमकर्दा गावातील ग्रामपंचायत समोर एका घरात देहव्यापार करण्यात येत आहे. या माहितीच्या आधारावर या कुंटणखान्यावर कारवाई केली गेली.

या दरम्यान दोन महिला व दोन पुरुष देह व्यापार करताना आढळून आले. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मोबाईल फोन, मोटर सायकल आणि काही प्रमाणात रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणी उरळ पोलीस ठाण्यात स्त्रीया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम ३,४,५ पीटा एक्ट १९५६ अन्वये गुन्हा नोंदविन्यात आला आहे.

जिल्ह्यातील निमकर्दा गावात चक्क ग्रामपंचायतसमोर अग्रवाल नामक महीला आपल्या राहत्या घरातच हां देह व्यापार चालवायची. ग्राहकांना आवश्यकतेनुसार पैशाच्या मोबदल्यात महिला व तरुणींचा पुरवठा केल्याचं समोर आलं आहे.

बाहेरील जिल्ह्यातीतून मूली आणून त्यांच्याकडून बेकायदेशीररित्या देहविक्री करून घेत असत, त्याच्या मोबदल्यात इतर महिलांना स्वतःचे घर, व जागा उपलब्ध करून देण्याच काम अग्रवाल करायची अन् पैशाचे अमिष दाखवून माहिला आणि तरुणींकडून वेश्‍या व्यवसाय करुन घेत असल्याचं समोर आलं. ग्राहकांकडून तासाचे २ हजार रुपये आकारले जात होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *