भंडारा
गर्भवती सुनेचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ट्रॅक्टर खरेदीसाठी माहेरहून एक लाखरुपयेआणण्यासाठी सासरच्या मंडळींना सुनेकडे तगादा लावला होता. भंडारा जिल्ह्यात हा प्रकार घडला. पती, दीर आणि सासूला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
भंडारा जिल्ह्याच्या लाखांदुर तालुक्यातील चप्राड येथे ही घटना घडल्याची माहिती आहे. सासरच्या माणसांनी गर्भवती सुनेचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. भावाच्या तक्रारीवरुन लाखांदूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. विवाहितेचा पती, दीर आणि सासूला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
रंजना होमराज बघमारे असे हत्या झालेल्या सुनेचे नाव आहे. या प्रकरणी पती होमराज बघमारे,सासू प्रमिला बघमारे आणि दीर संजय बघमारे यांना अटक करण्यात आली आहे.