दुर्दैवी!!!!!                  पुणे जिल्ह्यातील “या” गावात पंढरपूरहून परतणार्‍या वारकरी दाम्पत्यावर काळाचा घाला;टँकरच्या धडकेत पती-पत्नी ठार

दुर्दैवी!!!!! पुणे जिल्ह्यातील “या” गावात पंढरपूरहून परतणार्‍या वारकरी दाम्पत्यावर काळाचा घाला;टँकरच्या धडकेत पती-पत्नी ठार

पुणे

पंढरपूर येथून विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणार्‍या श्रीगोंदा तालुक्यातील वारकरी दाम्पत्याच्या दुचाकीला एका टँकरने जोराची धडक दिली.यात पतीचा जागीच मृत्यू झाला, तर रुग्णालयात उपचारादरम्यान पत्नीची प्राणज्योत मालविली. हा भीषण अपघात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भिगवण येथे रविवारी सकाळी घडला.

मल्हारी बाजीराव पवार (वय 57) पंखाबाई मल्हारी पवार (वय 50 रा. येळपणे, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) अशी मृतांची नावे असून, या दुर्घटनेमुळे येळपणे गावावर शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार पती-पत्नी हे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून सोलापूरकडून पुणे दिशेकडे दुचाकीने (एमएच 16 एजी 2343) चालले होते. आषाढी एकादशी असल्याने पवार दाम्पत्य पंढरपूर येथून विठ्ठलाचे दर्शन घेऊन आपल्या गावाकडे माघारी निघाले होते.

दरम्यान सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास भिगवण येथील रवींद्र सेल्स या दुकानासमोर त्यांच्या गाडीला टँकरने जोरदार धडक दिली.

यामध्ये पवार जागीच ठार झाले, तर पंखाबाई यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातानंतर टँकरचालक पळून गेला असुन, भिगवण पोलिस त्याचा तपास करीत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली.

दरम्यान, मृत दाम्पत्यावर येळपणे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.पवार यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *