दुर्दैवी!!!!!!                     उसतोड मजुर ट्रॅक्टरमध्ये सामान घेऊन जाताना विद्युत तारेचा ट्रॅक्टरला स्पर्श;एका मजुराचा जागीच मृत्यु

दुर्दैवी!!!!!! उसतोड मजुर ट्रॅक्टरमध्ये सामान घेऊन जाताना विद्युत तारेचा ट्रॅक्टरला स्पर्श;एका मजुराचा जागीच मृत्यु

पुणे

ऊसतोड मजूर ट्रॅक्टरमध्ये सामान घेऊन जात असताना रस्त्यावरून गेलेली विद्युत लाईनची तार खाली लोंबकळलेली असल्याने या तारेचं स्पर्श ट्रॅक्टरला झाला. यामुळे जोरदार झटका बसल्याने एका मजुराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना हातवळण- बनपिंपरी रस्त्यावर घडली. 

अहमदनगर जिल्ह्यातील सहकार महर्षी शिवाजी बापू नागवडे साखर कारखान्याचे मजूर २४ मार्चला रात्री दहा वाजता ऊसतोडचे काम संपून गावाकडे निघाले होते. यावेळी सर्व मजुरांनी ट्रॅक्टरमध्ये सर्व संसाराचे साहित्य भरून मार्गस्थ झाले होते. हातवळण – बनपिंपरी या  मार्गाने जात असताना ट्रॅक्टरला महावितरणच्या मेन लाईनला तार चिकटली.

यामुळे ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या एका मजुर ,महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी झाला आहे.सदरच्या घटनेत फुलाबाई नरसिंह जाधव या महिला मजुराचा मृत्यू झाला तर अंकुश रोहिदास जाधव हा मजूर गंभीर जखमी झाला असून त्यास छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *