संभाजी ब्रिगेडच्या पाठपुराव्यास आले यश
पुरंदर
गेल्या काही दिवसांपासून खूप लोकं अप प्रचार करत होते की पुरंदर किल्ला पर्यटनासाठी बंद होणार, परंतु गेल्या दोन वर्षांपासून covid-19 या जागतीक माहामारी मुळे सर्व जगाला संकटाचा सामना करावा लागला होता,आणि याच काळात हे भव्य दिव्य असे स्मारक सैन्य प्रशिक्षण केंद्र यांच्या कडून उभे राहिले.
या पार्श्वभूमीवर पुरंदर किल्ला येथील सैन्य प्रशिक्षण अधिकारी यांनी निर्णय घेऊन आणी काही नियम अटी घालून किल्ला सर्वांसाठी खुला केला आहे.यांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहे.खूप सुंदर पद्धतीने छत्रपती संभाजी महाराज यांच स्मारक तयार झाले आहे.आपणं कल्पना ही करु शकत नाही एवढे सुंदर आणि सुसज्ज असे स्मारक पाहुन छत्रपती संभाजी महाराज यांचा दैदिप्यमान इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला शिवाय राहणार नाही.
नियम अटी पुढीलप्रमाणे : १८ वर्षांवरील प्रत्येकाला लसीचे दोन्ही डोस आवश्यक आहे.सोबत स्वतःचे आधार कार्ड आणि डोस घेतलेले सर्टिफिकेट सोबत आसने आवश्यक आहे.तोंडावर मास्क आसने आवश्यक आहे.पुरंदर किल्ला हा सैन्य प्रशिक्षण केंद्र असल्यामुळे येथील जवानांना सहकार्य करावे हि विनंती पुणे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड संतोष हगवणे आणि तालुका अध्यक्ष सागरनाना जगताप यांनी केली आहे.