पुरंदर
पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील वाघापुर गावचे प्रगतशील बागायतदार व युवा उद्योजक मनोहर कुंजीर यांची पुरंदर तालुका शासकीय विद्युत वितरण समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
एक शांत,संयमी व सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी धाऊन येणारा सामान्य कार्यकर्ता म्हणुन पुरंदर तालुक्यात मनोहर कुंजीर यांची ओळख आहे.
त्यांच्या निवडीमुळे महावितरणच्या माध्यमातुन सर्वसामान्य,गोरगरीब व तळागाळातील नागरिकांना नक्कीच न्याय मिळेल अशी भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहे.
मनोहर कुंजीर यांना निवडीचे पत्र महावितरणचे अधिकारी ससाणे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी अँड.नितीन कुंजीर,प्रविण लोळे,रामभाऊ कुंजीर आदी उपस्थित होते.