चिखल तुडवायचाय, या मग पुरंदर तालुक्यातील “या” रस्त्यावर !!!!! रस्ता गेला खड्यात : दीड वर्षांपासून काम रखडले

चिखल तुडवायचाय, या मग पुरंदर तालुक्यातील “या” रस्त्यावर !!!!! रस्ता गेला खड्यात : दीड वर्षांपासून काम रखडले

पुरंदर

पुणे-पंढरपूर महामार्गावरील सासवड-सोनोरी रस्ता खड्ड्यात गेला असून, त्याला तळ्याचे स्वरूप आल्यामुळे प्रवाशांसह स्थानिकांना चिखल तुडवतच प्रवास करावा लागत आहे.

पंचायत समिती कमानीपासून ते महालक्ष्मी रेसिडेन्सी या दरम्यानच्या रस्त्याचे काम मागील दीड वर्षापासून रखडले आहे. या रस्त्यालगत पुरंदर तालुक्यातील पंचायत समिती ग्रामीण रुणालय पशुवैद्यकीय दवाखाना तर पुढे अनेक मोठ्या सोसायट्या आहेत, या रस्त्यावर वर्दळ असते, त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करण्याची मागणी येथील नागरिक करीत आहेत.

पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक दुचाकीचालकांना या खराब रस्त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर पादचाऱ्यांना या रस्त्यावरून चालत जाणे सुद्धा अवघड झाले आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. या पाण्यामुळे नागरिक, वाहनचालक हैराण आहेत. या मुख्य रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर लोक वस्ती असल्यामुळे मोरया सोसायटीसमोर दुपारनंतर भाजी विक्रेते बसतात. त्यांनाही खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे.

हा रस्ता हा 66 पीएमआरडीएच्या अंतर्गत मंजूर असून याचे टेंडर झालेले आहे. रस्ता हा ९ मीटर इतक्या रुंदीचा आहे. लवकरच ठेकेदाराला रस्त्याचे काम सुरू करण्याच्या सूचना देऊ.: निखील मोरे, मुख्याधिकारी, नगरपरिषद

नागरिकांनी व वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे.
या रस्त्याच्या बाजूने अंडरग्राउंड ड्रेनेज पाइपलाइनचे काम केले होते; परंतु ज्या ठिकाणी पाइप टाकण्यासाठी खोदाई केली गेली तो भाग बुजवून रोलिंग करून पूर्ववत करणे गरजेचे होते. ठेकेदारांनी त्या भागावर मुरूम टाकून रोलरने दाबून घेणे गरजेचे होते. याकडे सासवड नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष कले असल्याचे नागरिकांनी सांगितले. या खोदाईमध्ये काढलेला मुरूम ठेकेदाराने इतरत्र हलवला असल्याची देखील चर्चा परिसरामध्ये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *