नाशिक
साताळी तालुका येवला जिल्हा नाशिक येथील राष्ट्रसेवा दलाचे राज्याध्यक्ष अर्जुन कोकाटे यांचे कट्टर समर्थक ग्रामपंचायत सदस्य संगीता भाऊसाहेब जगताप यांनी साताळी ग्रामपंचायतच्या गावठाण जागेमध्ये अतिक्रमण केल्यामुळे त्यांना माननीय पालवे साहेब विभागीय अप्पर आयुक्त नाशिक यांनी उर्वरित काळासाठी अपात्र घोषित केले आहे त्यामुळे येवला तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहे.
साताळी तालुका येवला जिल्हा नाशिक येथील अर्जुन कोकाटे यांचे कट्टर समर्थक संगीता भाऊसाहेब जगताप यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा गैरवापर करत वाढीव बांधकाम केले व घराशेजारी ग्रामपंचायतच्या गावठाण जागेमध्ये दोन मजली अनधिकृत स्लॅबच्या इमारतीचे बांधकाम केले.
त्याचबरोबर अनधिकृतपणे स्वरा वायर इंडस्ट्रीज लोखंडी जाळी बनवण्याचा कारखाना देखील सुरू केला होता यास येथील माजी सरपंच भाऊसाहेब कळसकर व सामाजिक कार्यकर्ते सुरेश शांताराम सोनवणे यांनी अप्पर जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे ग्रामपंचायत विवाद अर्ज क्रमांक 56 /2021 नुसार अपील केले.
परंतु अप्पर जिल्हाधिकारी यांनी सदरचे अपील अमान्य केले होते व त्यानंतर येथील माजी सरपंच भाऊसाहेब कळसकर व सामाजिक कार्यकर्ते सुरेश सोनवणे यांनी या निकालावर व्यथित होऊन 28 डिसेंबर 2021 रोजी माननीय भानदास पालवे अप्पर आयुक्त नाशिक विभाग यांच्याकडे अपील दाखल केले सदरच्या अपिलावर सुनावणी होऊन सदरचे अपील मान्य होऊन उर्वरित काळासाठी ग्रामपंचायत सदस्य संगीता भाऊसाहेब जगताप यांना अपात्र घोषीत करण्यात आले आहे.
अर्जदार यांचे वतीने अॅड सोमनाथ घोटेकर यांनी कामकाज पाहिले भविष्यात सरकारी जागेवर कोणीही अतिक्रमण करणार नाही असा संदेश या निकाला मधून संपूर्ण जिल्ह्याला गेलेला आहे.
यासाठी भाऊसाहेब कळसकर, सुरेश सोनवणे,प्रा पोपटराव आहेर, तुळशीराम कोकाटे ,कचरू अहीरे ,दत्ता काळे,गोरखनाथ काळे,अभिमन्यु आहेर,मोहन कोकाटे,शांताराम कोकाटे,रतन काळे,शहाजीराजे काळे,कोकाटे,वेणुनाथ राजगुरू,वाल्मिक काळे,सुभाष कोकाटे,आप्पासाहेब कोकाटे,विलास कोकाटे,बाळु काळे,भागवत काळे,छबुराव काळे,बापु राजगुरू,वसंत काळे आदि विशेष प्रयत्नशील होते.