माळशिरस
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे भाजपा युवा मोर्चा पुरंदर चे अध्यक्ष विठ्ठल जगताप यांच्या गोविद्या गोसंवर्धन या संस्थेच्या वतीने तालुक्यातील शिक्षक व पत्रकार यांना गोमय गणेशाचे वाटप करण्यात आले.
देशी गाइच्या शेणापासुन व गोमुत्रापासुन बनविलेल्या सुबक अशा गणेश मुर्तींचे गणपती बप्पांच्या आगमण होण्यापुर्वी सासवड येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात वितरण करण्यात आले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपला देश महासत्ता होण्यासाठी दिलेल्या आत्मनिर्भर,स्वदेशी,स्वावलंबी,स्वस्थ भारताच्या संकल्पासाठी छोटेसे योगदान म्हणुन गोविद्या गोसंवर्धन संस्था, आंबळेच्या वतीने “विषमुक्त शिवार निरोगी परिवार” या अभियानांतर्गत जनजागृतीपर उपक्रम असुन येणार्या काळात विषमुक्त शेती बनविण्यासाठी प्रयत्नशील : विठ्ठल जगताप,अध्यक्ष ,पुरंदर तालुका भाजपा युवा मोर्चा
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य भाजपा ओबीसी सेलचे उपाध्यक्ष सचिन लंबाते,मा.जिल्हा नियोजन समिती सदस्य गिरिष जगताप,तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे,युवा मोर्चा अध्यक्ष विठ्ठल जगताप,सासवड शहर भाजपा अध्यक्ष साकेत जगताप,शिक्षक संघाचे गणेश लवांडे,राजेंद्र कुंजीर,तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामठे,सचीव अमोल बनकर,सहसचिव मंगेश गायकवाड,कोषाध्यक्ष निलेश भुजबळ,कार्यकारीणी सदस्य निखील जगताप,अमृत भांडवलकर,संतोष डुबल,हनुमंत वाबळे,छाया नानगुडे,सुजाता गुरव,सुनिता कसबे,अक्षय कोलते तसेच तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक व पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल जगताप यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार दत्तात्रय जगताप यांनी मानले.