जेजुरी
गावामध्ये घडणाऱ्या बारीक सारीक घटनांवर पोलीस पाटलांनी लक्ष द्यायला हवे.छोट्या छोट्या गोष्टी मधूनच पुढे मोठ्या गोष्टी घडत असतात.गावातील कायदा सुव्यवस्था सांभाळायची जबाबदारी पोलीस पाटलांची आहे.त्यामूळे त्यांनी गावात नेहमी सतर्क असायला हवे. असे म्हणत.गणेश उत्सव काळात पाटलांनी सतर्क राहून हा उत्सव सुरळीत पार पडावा अशा सूचना जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी आज पोलीस पाटलांना दिल्या आहेत.
जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये गणेश उत्सवाच्या अनुसंगने पोलीस प्रशासन व पोलीस पाटील यांची आढावा बैठक पार पडली. यामध्ये गणेश उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कोणत्या उपाय योजना करता येतील याबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी मार्गदर्शन करताना महाडिक म्हणाले की, सध्याचा काळ सोशल मीडियाचा आहे.पाटलांची आता आणखी जबाबदारी वाढली आहे.
गावातील अनेक सोशल मीडिया ग्रुप मधून
चुकीचे संदेश पाठवले जातात.यातून अनेकांच्या भावना दुखावल्या जातात.त्यामूळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.त्यामूळे पोलीस पाटलांनी यावर लक्ष द्यायला हवे.अशा लोकांची माहिती संकलित करून पोलीस स्टेशनला दिल्यास पुढे घडणारे मोठे गुन्हे टाळता येतील. यावेळी जेजुरी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या सर्व गावातील पोलीस पाटील उपस्थित होते.यावेळी वाळूंजचे पोलीस पाटील इंगळे यांनी प्रास्तविक केले तर आभार पिंगोरीचे पोलीस पाटील राहुल शिंदे यांनी मानले.