पुरंदर
सासवड सुपे रस्त्यावरील पिसर्वे नजिक असलेल्या रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचले आहे.यामुळे भुयारी मार्गाच्या उभारणीसाठी खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यातच गेले असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.
पिसर्वे पारगाव मेमाणे हद्दीत रेल्वे क्रॉसिंग ठिकाणी पूर्वी गेट असल्याने गाडी येण्या जाण्याच्या वेळेस गेट बंद ठेवावे लागत होते.परिणामी वाहनधारकांना ताटकळत उभे राहावे लागत असे.यामुळे येथे रेल्वे विभागाने नागरिकांच्या सोयीसाठी भुयारी मार्ग तयार केला होता.
मात्र नुकत्याच झालेल्या पावसाचे पाणी या मार्गात साचल्याने भुयारी मार्ग सोयीपेक्षा अडचणींचा अधिक ठरत आहे. पावसाने भुयारी मार्गात पाणी साचले आहे.
नागरिकांच्या सोईसाठी भुयारी मार्गासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले मात्र पाहिल्यास पावसात भुयारी मार्गात पाणी साचल्याने पाण्याच्या विल्हेवाटीचे योग्य नियोजन न झाल्याचे दिसून आले.यामुळे नागरिकांच्या सोईसाठी झालेला कोट्यवधी रुपयाचा खर्च पाण्यातच गेला अशी खंत नागरिक व्यक्त करीत आहेत.
यावर्षीही आम्ही हाल अपेष्टा सोसायच्या का ? केंद्र शासनाकडून भुयारी मार्गाची कोट्यवधी रुपये मंजूर झाले.मात्र पुढे कामाला हवी तेवढी गती न मिळाल्याने शेतकऱ्यांनी लांबच्या पल्याने प्रवास करत गतवर्षीच्या पावसाळ्यात हाल अपेष्टा सहन केल्या.भुयारी मार्ग पूर्ण होऊन देखील योग्य नियोजन न झाल्याने यावर्षी देखील शेतकऱ्यांनी हाल अपेष्टाच सोसायच्या का ? असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत.