पुणे
सोशल मीडियावर सुसाईड नोट लिहून पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब माळी हे सोमवार पासून बेपत्ता झाले आहेत.
माझी आर्थिक फसवणूक झाली असून मला शोधण्याचा प्रयत्न करू नये असे त्यांनी सुसाईट नोटमध्ये उल्लेख केला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.सविस्तर माहिती अशी की, बाळासाहेब माळी हे सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आपली पत्नी सुरेखासोबत घरी बसले होते.
यावेळी त्यांच्या दत्ताकृपा पेट्रोल पंपावर मॅनेजर असलेला तानाजी अर्जुन कोळी व पुतण्या प्रदीप माळी यांनी पैशाची अफरातफर केली असल्याचे सांगितले.
त्यामुळे बाळासाहेब हे तणावात होते. त्यानंतर ते पेट्रोल पंपावरुन जाऊन येतो असे सांगून पेट्रोल पंपाकडे चालत निघून गेले. थोड्या वेळाने बाळासाहेब यांचे मित्र बंडु भुईरकर हे घरी आले आणि बाळासाहेबांनी गाडीची चावी मागितली आहे असे त्यांनी सांगितले.यानंतर बंडु भुईरकर हे गाडीची चावी आणि पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी घेऊन गेले.
त्यानंतर थोड्याच वेळात बाळासाहेब माळी यांच्या मोबाईलवरून “मी आत्महत्या करीत आहे, तानाजी कोळी याचे फसवणुकीला कंटाळून निघून चाललो आहे. माझा शोध घेऊ नका” असा मेसेज आला.
त्यानंतर सुरेखा माळी यांनी पती बाळासाहेब माळी यांना फोन केला परंतु त्यांचा फोन बंद होता. त्यानंतर त्यांनी भाऊ परमेश्वर व दीर रामदास माळी यांच्यासह बाळासाहेब माळी यांचा आजुबाजुला तसेच पाहुण्यांकडे शोध घेतला, परंतु ते खुठेच असल्याची माहिती मिळाली नाही.
त्यानंतर मंगळवारी दुपारी सुरेखा माळी यांनी करकंब पोलीस ठाण्यामध्ये आपले पती बाळासाहेब माळी हे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे.