कोरोनानंतर वटवाघळांमुळे पसरतोय Marburg Virus; जाणून घ्या लक्षणं

कोरोनानंतर वटवाघळांमुळे पसरतोय Marburg Virus; जाणून घ्या लक्षणं

मुंबई

कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातलं होतं. वटवाघूळांमुळे परसलेल्या या घातक व्हायरसने आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला. अजूनही जगावरून कोरोनाचा धोका टळलेला नाही. अशाच परिस्थितीत आता वटवाघूळांमुळे पसरणाऱ्या अजून एका व्हायरसचा धोका असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे. 

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, Marburg Virusच्या पहिल्या प्रकरणाची पुष्टी दक्षिणी ग्वाइडो प्रांतात झाली आणि आता 150 पेक्षा जास्त लोकांना त्याच्या या विषाणूची लागण झाली आहे. नुकतंच एका व्यक्तीचा यामुळे मृत्यू झाला आहे, त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

या व्हायरसचं पहिल्यांदा निदान 1967 मध्ये करण्यात आलं होतं. हा संसर्ग रक्तस्रावी ताप निर्माण करण्यास सक्षम आहे आणि हा इबोला सारखाच आहे. हा एक गंभीर आजार आहे ज्याचे घातक परिणाम होऊ शकतात. जाणून घेऊया या व्हायरसविषयी…

मारबर्ग वायरसचा मृत्य दर 88%

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे आफ्रिकेचे प्रादेशिक संचालक डॉ मतशीदिसो मोएती म्हणाले की, मारबर्ग विषाणूची दूरदूरपर्यंत पसरण्याची क्षमता याचा अर्थ आपल्याला त्याच्या ट्रॅकमध्ये थांबवणं आवश्यक आहे. डब्ल्यूएचओच्या मते, मारबर्ग विषाणू वटवाघळांद्वारे पसरतो आणि त्याचा मृत्यू दर 88 टक्क्यांपर्यंत आहे. मारबर्ग विषाणू इबोला विषाणू आणि कोरोनापेक्षा प्राणघातक असल्याचं म्हटलं जातं, जो प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरतो.

कसा पसरतो मारबर्ग व्हायरस?

हा विषाणू संक्रमित व्यक्तीसोबत शारीरिक द्रव्याच्या देवाणघेवाणीद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये देखील पसरू शकतो. डब्ल्यूएचओने या विषाणूबद्दल माहिती दिली आहे की जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या संपर्कात येते, तेव्हा शरीरातून बाहेर पडणारा द्रव पदार्थ पृष्ठभाग आणि अनेक वस्तू दूषित करतो.
यांच्या संपर्कात आल्यानंतर, व्यक्तीला इतका वाईट संसर्ग होतो की योग्य उपचार न मिळाल्यास त्याचा मृत्यूही होऊ शकतो. हा कालावधी 2 ते 21 दिवसांचा असू शकतो. एका आठवड्यात तुम्हाला त्याची लक्षणं दिसू लागतील.

मारबर्ग व्हायरसची सामान्य लक्षणं

  • अस्वस्थता
  • तीव्र डोकेदुखी
  • ताप
  • अतिसार
  • मळमळ
  • पोटदुखी
  • थकवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *