पुणे
अनिल देशमुख आणि सचिन वाझे प्रकरणावरून संजय राऊतांनी आज देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय.कावळ्यानं टोचून-टोचून फडणवीसांना रक्तबंबाळ केलंय. रेटून खोटं बोलल्यामुळे कावळ्यांनी त्यांच्यावर हल्ले केलेत, अशा शब्दांत राऊतांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला.
दरम्यान, परमबीर सिंह आणि फडणवीसांमध्ये डील झाली होती. या आरोपांना उत्तर देतान फडणवीसांनी ‘झूठ बोले कौवा काटे… काले कौवे से डरियो’, असं उत्तर दिलं होतं… याला आज राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
देवेंद्र फडणवीस आणि परमबीर सिंह यांच्यात डील झाली होती आणि त्यानुसारच परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप लावले असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. याबद्दल विचारण्यात आलं असता देवेंद्र फडणवीस यांनी ‘झूठ बोले कौवा काटे… काले कौवे से डरियो’ असा चिमटा काढला.
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानाबद्दल विचारलं असता त्यांनी कावळ्यानं टोचून-टोचून फडणवीसांना रक्तबंबाळ केलं आहे असा टोला लगावला. ते म्हणाले की, त्यांचं शरीर पाहिलं का? कावळ्यांनी टोचून टोचून रक्तबंबाळ केलं आहे. त्यांनी मलमपट्टी केली आहे. रेटून खोटं बोलल्याबद्दल कावळ्यांनी त्यांच्यावर किती वेळा हल्ले केले आहेत.